Vasantrao Deshmukh Vidya Vikas Prashala
विद्या विकास मंडळ या संस्थेच्या नावाने १९४६ साली विद्याविकास प्रशाला या नावाने शाळा सुरु झाली. दि. २८-१२-१९४८ रोजी प्रमाणपत्र मिळाले. प्रमाणपत्र माधव गोविंद काटकर यांनी स्वीकारले. शाळेला पूर्वी वर्तक काटकर आपटे यांची शाळा असे ओळखले जायचे. १९५३ साली शाळेतील पहिली batch बाहेर पडली. १९७५ पासून एस.एस.सी. अभ्यासक्रमा व्यतिरिक्त एस.टी.सी. शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु झाला.
शिंदे चौक, सोलापूर येथील माढेकर यांची व्यास यांच्या जागेत प्रथम शाळा भरायची. त्यानंतर गणपती घाट, सोलापूर येथे शाळा भारत आहे.
काही काळाने विद्या विकास मंडळाकडून ब्राम्हण समाज सेवा संघ कडे शाळा हस्तांतरण करण्यात आली. सन २००० पासून शाळेच्या नावात बदल करण्यात आला. वसंतराव देशमुख विद्या विकास प्रशाला असे शाळेचे नवीन नाव.