कार्यक्रम
सुसंकृत विद्यार्थी परंपरा निर्माण व्हावी हा प्रामाणिक प्रयत्न ब्राम्हण समाज सेवा संघ संचलित वसंतराव देशमुख विद्याविकास प्रशाला गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहे. ज्ञानदानाची हि तेजस्वी परंपरा यशस्वीपणे चालू राहण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये उत्तमोत्तम गुणांचे संवर्धन होण्यासाठी प्रशालेमध्ये विविध सांस्कृतिक स्पर्धा, शैक्षणिक सहल, क्षेत्रभेटी यांचा समावेश असतो.
दिनविनेश-
शिक्षणातून कर्तव्यबुद्धी,विवेकबुद्धी, सचोटी जागृत करून विद्यार्थ्यांना नवनवीन दिशा देण्यासाठी प्रशालेमध्ये वेळोवेळी विविध दिनविशेष साजरे केले जातात. अनेक थोरांच्या जयंती, पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा परिचय करून दिला जातो. तसेच गुरुपौर्णिमा, योग्य दिन, विविध नेत्यांची जयंती, पुण्यतिथी,स्वातंत्र दिन, शिक्षक दिन, संविधान दिन, बालदिन, शाहिद दिन, प्रजासत्ताक दिन, विज्ञान दिन, महिला दिन यासारखे विविध दिन साजरे करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो.
सण व उत्सव -
शिक्षणासाठी लागणार उत्साह व उत्सुकता हे गुण बाळगले जावेत यासाठी प्रशालेमध्ये विविध सण व उत्सव साजरे केले जातात. यावर्षीही रक्षाबंधन, दहीहंडी, गणेशोत्सव, दिवाळी, मकरसंक्रांत यासारखे सण व उत्सव साजरे करण्यात आले.
विविध स्पर्धा -
सध्याच्या युगात टिकून राहण्याच्या उद्देशाने प्रशालेत विविध स्पर्धांचे आयोजन केले गेले. यामध्ये चित्रकला स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, पाठांतर स्पर्धा इ. स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. नामांकित कंपनी तर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत प्रशाळेतील ६ विद्यार्थिनींनी बक्षीस मिळवले. दिवाळीच्या निमित्ताने आकाशदिव्यांच्या स्पर्धेचेही आयोजन केले होते.
विविध उपक्रम-
नूतन वर्षाची सुरुवात वर्ग स्वछता व सजावट या उपक्रमाने झाली. यामध्ये प्रशालेतील सर्व वर्गखोल्या स्वखर्चातून व श्रमदानातून रंगविल्या व सजविल्या. विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान मिळावे या उद्देशाने प्रशालेमध्ये खाद्ययात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
शैक्षणिक सहल व क्षेत्रभेट -
यावर्षी प्रशालेचे एक दिवशीय सहल नळदुर्ग या ठिकाणी नेण्यात आली. तसेच स्मृतिवन येथे क्षेत्रभेट देण्यात आली. तसेच विज्ञान प्रदर्शनास भेट दिली.
निरोप समारंभ-
प्रशालेतील इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ दिनांक २६ फेब्रुवारी रोजी करण्यात आला. यावेळी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
ज्ञानदानाच्या या तेजस्वी परंपरेमध्ये ब्राम्हण समाज सेवा संघ, सोलापूर या संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, शिक्षक, पालक, आजी-माजी विद्यार्थी या सर्वांचे बहुमोल सहकार्य लाभले. वेळोवेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमास संस्थेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
क्रीडा सप्ताह २०१८-१९
(दि. १० डिसेंबर ते १५ डिसेंबर)
१) १०डिसेंबर, सोमवार- उदघाटन
( १.धावणे २.लिंबू चमचा )
२) ११ डिसेंबर, मंगळवार
( १. त्रिपादशर्यत २. स्लोव सायक्लिंग ३. सॅक रेस )
३) १२ डिसेंबर, बुधवार
( १. लंगडी २. गोळाफेक ३.दोरी उड्या )
४) १३ डिसेंबर, गुरुवार
( १. हत्तीला शेपूट २. संगीत खुर्ची ३. बादलीत चेंडू )
५) १४ डिसेंबर, शुक्रवार
( १. फन फेयर )
६) १५ डिसेंबर, शनिवार
( १. १.क्रिकेट २. लगोर )